पन्नास पत्रे देवूनही मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत – सुप्रिया सुळे

पुणे – मुंढवा येथील कारकस प्लॅन्टला पर्यावरण खात्याने परवानगी नाकारल्याबददल तो प्लॅन्ट दुस-या ठिकाणी स्थलातरीत करावा लागणार आहे. त्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तब्बल 50 पत्रे दिली आहेत. तरीही कोणतीही निर्णय घेतलेला नाही अशा शब्दात राष्ट्रवादी नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टिकेची झोड उठविली आहे.

supriya-sule23
पुणे – महापालिकेच्या महात्मा फुले सभागृहात उभारलेल्या व्हिडीओ कॉन्फरसिंग प्रकल्पाचे उदघाटन सप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्यांनतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात वाढत्या नागरिकरणामुळे खडकवासला आणि आसपासच्या गावामंध्ये सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पिण्याचे पाणी , रस्ते, वाहतुक कोंडी , सांडपाणी व्यवस्थापन आणि पिण्याचे पाणी याबाबत प्रलंबित प्रश्‍नांचा आढावा घेण्यात आला.

काही महिन्यापुर्वी फुरसुंगी आणि देवाची उरुळी येथील कचरा समस्येवर झालेल्या बैठकीत शहराच्या चारही बाजूला कचरयावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारु असे आश्‍वासन दिले होते. पण ते आश्‍वासन पालिकेने पाळले नाही. त्यामुळे या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या चार पैकी दोन जागाचे भुसंपादन झाले असुन त्या ठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम तातडीने करावे असे सुळे यांनी सांगितले.

इतरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करणार नाही, बारामती लोकसभा मतदारसंघातील कामाचा आढवा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, इतरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ आपण करणार नाही. पाण्याचा योग्य वापर आणि नियोजन यावर यापुढच्या काळात भर देण्यात येणार आहे. वाढत्या नागरिकरणात जीवनशैली बदलली असल्याने पाण्याची हाताळणी योग्य पद्धतीने होत नसल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

विधानसभेच्या जागा वाटपाबाबत आताच काही सांगता येणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षेनेते योग्यवेळी घेतील. आम्हाला विधानसभेच्या तयारीसाठी तीन महिने पुरेसे आहेत असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. एलबीटीचा आमचा निर्णय झालेला आहे एलबीटीबाबत राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ठरलेली आहे. एका चौकटीत आम्ही त्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एलबीटीबाबत आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर चर्चा केली आहे. अनेकवेळा चर्चा झाली आहे. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो काँग्रेसने घ्यावा असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Leave a Comment