नरेंद्र मोदींना ब्राझीलकडून फिफा वर्ल्डकपसाठी आमंत्रण

narendra-modir
नवी दिल्ली – भूतानचा पहिला विदेश दौरा पूर्ण करताच पंतप्रधान मोदींना पुन्हा एका विदेशी दौ-याचे आमंत्रण मिळाले आहे. मोदींना सध्या सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष दिलमा रौसेफ यांनी निमंत्रित केले आहे. मात्र मोदींनी रौसेफ यांचे आमंत्रण स्वीकारले की नाही या बाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

फिफा विश्नचषकाचा अंतिम सामना १३ जुलै रोजी रिओ दा जेनिरो येथे रंगणार आहे. यासाठी रौसेफ यांनी मोदींना निमंत्रण धाडले आहे. मोदींनी सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले तर २०१४ च्या ब्रिक्स समुहाच्या परिषदेत मोदींसोबत ब्राझीलमध्ये दाखल होणा-या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपियांग आणि दक्षिण आफ्रिकेचे जॅकब झुमा हे त्यांचे सहकारी असतील. १५ जुलै ते १७ जुलै दरम्यान फोर्टलेझा येथे ब्रिक्स समूहाची परिषद होणार आहे.

गेल्या आठवड्यात मोदींनी फिफा विश्नचषक २०१४ साठीच्या पोस्टल स्टँपचे अनावरण केले होते. तसेच हा विश्नचषक विविध देशांना
जोडणारे माध्यम ठरावे असे सांगत त्यांनी फिफा विश्नचषक स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

Leave a Comment