‘त्या’तरुणांच्या मृत्यूप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

kiritsomaya
मुंबई – भरउन्हात शारीरिक चाचणी परीक्षा घेऊ नका ,असे निर्देश मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले असले तरी पोलिस भरती प्रक्रियेवेळी चार तरुणांचा मृत्यू झाल्याने भाजपचे खासदार किरीट सोमय्या मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार आहेत. परिणामी पोलिस विभाग आता अडचणीत आला आहे.

मुंबईत पोलीस भरतीच्या वेळी मालवण येथील अंबादास सोनावणे, विरार येथे राहणारा प्रसाद माळी, विशाल केदार आणि राहुल सकपाळ यांचा मृत्यू झाला आहे. पोलिस भरतीसाठी होणाऱ्या शारीरीक चाचणी दरम्यान उमेदवारांना पाच किलोमीटर धावावे लागते.या धावण्याच्या चाचणी दरम्यान हे चारही तरुण दगावले आहेत. या चारही तरुणांच्या मृत्यूनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधानसभेत अधिवेशना दरम्यान याचे पडसाद उमटले होते.

किरीट सोमय्या यांनी विक्रोळी येथील पोलिस भरती केंद्राला भेट दिली होती. तसेच याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. आता ते थेट मानव अधिकार आयोगाकडे तक्रार करणार आहेत.

Leave a Comment