केनिया; दहशतवादी हल्ल्यात ४८ ठार

kenya
नैरोबी- केनियातील म्पेकेटोनी शहरात सोमाली दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ४८ जण ठार झाले आहेत. सशस्त्र दहशतवाद्यांनी समुद्र किना-यावर असलेल्या एका शहरात जोरदार गोळीबार केला.

शहरातील अनेक भागात नागरीक फिफा विश्वचषकाचा सामना पाहताना दहशतवाद्यांनी रात्री आठच्या सुमारास शहरात गोळीबार केला. दहशवाद्यांनी दोन हॉटेलसह एका पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचे अधिका-यांनी सांगितले.

या दहशतवादी हल्ल्यामागे सोमालीयातील ‘अल-कायदा’ संघटनेशी संबंधीत ‘अल-शबाब’ ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे पोलिस अधिकारी डेव्हीड किमाइयो यांनी सांगितले. शहरातील ब्रीज व्यू हॉटलमध्ये दहशवाद्यांनी प्रवेश करून गोळाबार सुरु केला. हॉटेलमध्ये फिफा विश्वचषक सामना पाहण्यासाठी आले होते. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे.गेल्या काही महिन्यांपासून केनियामध्ये दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले आहेत. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा आदी देशांनी केनीयामध्ये आणखी दहशतवादी हल्ले होऊ शकतात असा इशारा दिला होता.

Leave a Comment