काम अपेक्षेनुसार नसेल तर पुन्हा आंदोलन- अण्णा हजारे

annahazare
पुणे – केंद्रात नव्याने सत्ता हाती आलेल्या मोदी सरकारने येत्या पाच सहा महिन्यात अपेक्षेनुसार काम केले नाही तर या सरकारविरोधातही पुन्हा देशव्यापी आंदोलन सुरू केले जाईल असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. अण्णांचा ७६ वा वाढदिवस स्नेहालय संस्थेत १५ जून रोजी साजरा केला गेला तेव्हा अण्णा बोलत होते.

ते म्हणाले की मोदी सरकारकडून त्यांच्या मेाठ्या अपेक्षा आहेत. हे सरकार देश व समाजहितासाठी चांगले काम करेल असे वाटते. त्यांनी खरोखरच त्या दृष्टीने काम केले तर या सरकारला माझा पाठिंबा आहे. मात्र त्यांनी समाजहित लक्षात घेतले नाही तर या सरकारविरोधातही आंदोलन छेडले जाईल. इच्छाशक्ती असेल तर पाच वर्षात देशाची परिस्थिती सुधारणे शक्य आहे. येत्या १-२ महिन्यात देशव्यापी दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अण्णा म्हणाले की वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मीच स्नेहालय संस्थेत येतो. येथे चाललेले समाजकार्य पाहिले की मला त्यातून उर्जा मिळते. निरपेक्ष भावनेने हे काम युवा वर्ग चालवित आहे. अण्णांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर याचे आयोजन केले गेले होते तसेच यूपीएससी मध्ये यशस्वी झालेल्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

Leave a Comment