एंडर्स सेल्सियसच्या स्मरणार्थ थर्मामीटर बसविलेले नाणे

coin
सेल्सियस या तापमान मोजणीसाठीच्या स्लेकचा शोध लावणारा संशोधक एंडर्स सेल्सियस याला श्रद्धांजली म्हणून पॅसिफिक क्षेत्रातील कुक आयलंड या देशाने एक नाणे सादर केले असून या नाण्यात थर्मामीटर लावला गेला आहे. या नाण्याचे अधिकृत विक्रीचे अधिकार असलेले भारतातील आलोक गोयल यांनी ही माहिती दिली आहे.

गोयल म्हणाले की एंडर्सचा मृत्यू १७४४ साली झाला. त्याला श्रद्धांजली म्हणून हे विशेष लिमिटेड एडिशन नाणे प्रकाशित करण्यात आले आहे. जगभरातील विक्रीसाठी अशी केवळ १७४४ नाणी तयार केली गेली आहेत. कॉईन इन्व्हेस्ट ट्रस्ट ऑफ लिस्टंटिनने ही नाणी जारी केली आहेत. स्टर्लींनच्या चांदीच्या नाण्याच्या वजनाइतक्या वजनाचे हे नाणे ५० मिमी व्यासाचे आहे. त्याची किंमत ५ डॉलर्सच्या बरोबरीची आहे. जुलैच्या मध्यात हे नाणे बाजारात आणले जाणार आहे.

Leave a Comment