आता एमटीडीसीकडून पर्यटनस्थळांची स्वच्छता

mtdc
मुंबई -भारत अभियान अंतर्गत एमटीडीसी पर्यटन स्थळांची स्वच्छता करणार आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुण्यातील शनिवारवाडा, कार्ला लेणी व राजमाजी किल्ल्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती एमटीडीसीच्या अधिकार्‍यांनी दिली. यामध्ये पर्यटनस्थळावर साचलेला कचरा, गुटखा आणि सिगारेटची पाकिटे, किल्ल्यांच्या भिंतीवरील रंगवलेली प्रियकरांची नावे काढण्यात येणार आहे.

पर्यटन मंत्रालयाकडील अपुर्‍या मनुष्यबळामुळे पर्यटनस्थळांची स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे पर्यटनस्थळावर अस्वच्छता दिसते. त्यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होतो. पर्यायी पर्यटन पाठ फिरवतात. त्यामुळे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देखभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. त्याची सुरुवात ताजमहलचा परिसर स्वच्छ करून केली आहे. यामध्ये देशातील सर्व पर्यटनस्थळे, किल्ले, समुद्र किनारा, बिचेस, लेण्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. स्वच्छ अभियानाच्या दुसर्‍या टप्प्यात पुण्यातील पानशेत धरण आणि सिंहगड किल्ल्यांवर स्वच्छता करण्यात येणार आहे.

Leave a Comment