विधान परिषदेवर जोगेंद्र कवाडे ,गाडगीळ यांची वर्णी

vidhansabha
मुंबई – रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे आणि कॉंग्रेस नेते अनंत गाडगीळ यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकी वेळी पाठिंबा देण्याच्या बदल्यात विधान परिषदेवर नियुक्ती करण्याचे आश्वासन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालाकडे करण्यात आली होती. नांदेडचे माजी नगराध्यक्ष सत्तार यांच्या नावाचा आग्रह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धरला होता. मात्र, खलिफे यांना संधी दिल्याने दुसऱ्या मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी का, असा प्रश्न निर्माण झाला. या सर्व पार्श्वभूमीवर अनंत गाडगीळ यांची नियुक्ती करण्याचा शिफारस करण्यात आली.त्यानुसार गाडगीळ यांची वर्णी लागली.

Leave a Comment