राज्य सरकारला पोलिस भरती मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

mumbai-high-court
मुंबई- उच्च न्यायालयाने मुंबईत पोलिस भरती दरम्यान झालेल्या चार युवकांच्या मृत्यू प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावत या नोटीसचे उत्तर सात दिवसात मागितले आहे. तर या बाबत पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे. भरती दरम्यान राहुल सकपाळ, विशाल केदारे, अंबादास सोनावणे आणि प्रसाद माळी या युवकांचा मृत्यू झाला होता.

पाच किलोमीटर धावण्याची चाचणी सुरू असताना त्यांना भोवळ आली. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर मुंबई पोलिस आणि राज्य सरकार विरोधात अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनातही यावर प्रश्न मांडण्यात आला.

या चारही तरुणांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर केली. शिवाय जे दोनजण दवाखान्यात दाखल आहेत त्यांचा खर्चही सरकार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे पोलिस भरतीवेळी पाच किलोमीटर धावण्याची अट शिथिल केली जाईल. ती तीन किमी केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment