मालकासाठी प्रीती झिंटाविरोधात ‘वाडिया’चे कर्मचारी एकवटले

wadia-hospital
मुंबई
छेडछाडीच्या प्रकरणात आपल्या मालकाला गोवण्यात आल्याने ,मालकासाठी ‘वाडिया’चे कर्मचारी सरसावले असून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये प्रख्यात उद्योजक नेस वाडिया यांच्याबरोबर राहणाऱ्या अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्यावरच कर्मचार्यांनी आक्षेप घेत, तिच्याविरुद्ध छेडछाडीविरोधी कायद्याचा दुरुपयोग केल्याची तक्रार मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात केली आहे.

तक्रार करणारे लोक हे वाडिया रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. आपला मालक गोत्यात आल्याचे पाहून वाडियाच्या १०-१२ कर्मचाऱ्यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रिती अनेक वर्षे नेस वाडियांसोबत राहत होती. इतकी वर्षे प्रियकर-प्रेयसी म्हणून एकत्र राहिल्यानंतर, वावरल्यानंतर किरकोळ वादाचे निमित्त करून छेडछाडीची तक्रार करणे हा कायद्याचा दुरुपयोग आहे. त्यामुळे प्रितीवर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment