`ब्लॅकबेरी`चा सर्वात स्वस्त `स्मार्ट फोन`
मुंबई – स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेली ब्लॅकबेरी कंपनी सर्वात कमी किंमतीचा स्मार्ट फोन बाजारात आणणार आहे, हा हॅण्डसेट ब्लॅकबेरीच्या Z3 सिरीजमध्ये असणार आहे.
एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार इंडोनेशियाच्या बाजारानंतर ब्लॅकबेरी पुढील दोन आठवड्यात Z3 सेट भारतीय बाजारात आणणार आहे. हा फोन ब्लॅकबेरीचा आतापर्यंतचा सर्वात कमी किमतीचा फोन असेल, या फोनची किंमत 11 हजार असणार आहे. हा फोन भारतात कधी लॉन्च होईल याची अधिकृत तारीख अजून ब्लॅकबेरीने जाहीर केलेली नाही. हा मिडल रेंजचा स्मार्टफोन फीचर आणि लूक अधिक अॅक्टीव्ह करणार आहे. या फोनचा डिस्प्ले 5 इंचाचा असेल, या फोनचं पिक्सल रिझोल्यूशनचं 540×960 असेल. हा ब्लॅकबेरी फोन 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे, या फोनला प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 400 SoC असेल. या फोनचा रॅम दीड जीबीचा असेल, 5 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 1.1 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल.