फुटबॉलमध्येे स्वित्र्झलडला निसटता विजय

fifa

स्वित्र्झलडला – सातत्याने गोलसाठी समान पद्धतीने प्रयत्न करणा-या स्वित्र्झलड आणि इक्वेडोर यांच्यातील मुकाबला प्रेक्षकांसाठी थरारक खेळाची पर्वणी ठरला. या चित्तरथरारक सामन्यात शेवटच्याीक्षणी फ्री-किकवर हेडरद्वारे झालेले गोल या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले. त्याचमुळे हा सामना स्वित्र्झलडला विजय मिळविता आला.

निर्धारित वेळेत १-१ बरोबरीत असणारा इक्वेडोर आणि स्वित्र्झलड यांच्यातला मुकाबला बरोबरीत सुटणार असे चित्र होते. मात्र अतिरिक्त वेळेत रिकाडरे रॉड्रिग्जने दिलेल्या पासवर हॅरिस सेफेरोव्हिकने सुरेख गोल साधत स्वित्र्झलडला निसटता विजय मिळवून दिला. सातत्याने गोलसाठी समान पद्धतीने प्रयत्न करणाऱ्या स्वित्र्झलड आणि इक्वेडोर यांच्यातील मुकाबला प्रेक्षकांसाठी थरारक खेळाची पर्वणी ठरला.

फ्री-किकवर हेडरद्वारे झालेले गोल या सामन्याचे वैशिष्टय़ ठरले. २२व्या मिनिटाला इनर रेमबटरे व्हॅलेन्सिआने गोल करत इक्वेडोरला झटपट आघाडी मिळवून दिली. वॉल्टर अयोव्हीच्या फ्री-किकवर व्हॅलेन्सिआने हेडरद्वारे जोरदार गोल केला. मध्यंतरानंतर व्हॅलेटिन स्टॉकरच्या जागी अडमिर मेहमेदीला संधी देण्यात आली. दोनच मिनिटांत या संधीचा पुरेपूर फायदा उठवत ४८व्या मिनिटाला अडमिर मेहमेदीने इक्वेडोरच्या खेळाडूंप्रमाणेच फ्री किक आणि हेडर समीकरणाद्वारे गोल करत बरोबरी केली. रिकाडरे रॉडिग्जच्या फ्री-किकवर अडमिरने सहज हेडरद्वारे गोल केला. इक्वेडोरच्या व्हॅलेन्सिआने वारंवार गोलसाठी प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वीच ठरले.

Leave a Comment