‘पेड अशोक पर्व’चा फैसला २० जून रोजी

ashok-chavan
नवी दिल्ली – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पेड न्यूज प्रकरणी दिलासा मिळतो की त्यांना दोषी ठरविले जाते ,याचा फैसला येत्या २० जूनरोजी होणार आहे,परिणामी त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असून खासदारकीवर गंडांतर येवू शकते.

अशोक चव्हाणांच्या पेड न्यूज प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगासमोर मागील ८ दिवसांपासून अशोक चव्हाण यांच्या पेड न्यूज प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आज ती सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. या बाबतचा निकाल आयोग २० जूनला देणार आहे.या पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने अशोक चव्हाणांवर पाच आरोप निश्चित केले आहेत. सन २००९ च्या निवडणूकीच्या वेळचे हे पेड न्यूज प्रकरण आहे. जर हे प्रकरण अशोक चव्हाणांच्या विरोधात गेले तर मात्र त्यांची खासदारकीची टर्म अल्पजीवी ठरणार आहे.

२००९ च्या निवडणुकीत भोकरमधून विजयी झालेल्या अशोक चव्हाण यांच्या निवडणूक खर्चासंबंधी डॉ. किन्हाळकर यांनी डिसेंबर २००९ मध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

Leave a Comment