डॉ. होमी भाभांच्या बंगल्याचा लिलाव नको

homibhabha
मुंबई – भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील बंगल्याचा लिलाव न करता हा बंगला ‘हेरिटेज वास्तू’ म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

डॉ. होमी भाभा यांचा हा बंगला केवळ मुंबईच्याच नव्हे तर भारताच्या आधुनिक इतिहासाची पाऊलखूण मानली जाते. कमला नेहरू पार्क (हँगिंग गार्डन) शेजारच्या या बंगल्याचा लिलाव जूनमध्ये करण्याचा निर्णय या जागेचा ताबा असणार्‍या ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ने (एनसीपीए) घेतला होता. लिलावाची प्राथमिक किंमत २५७ कोटींची ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment