`एसबीआय`मध्ये होणार मेगाभरती

state-bank
मुंबई – स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला देशातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखले जाते. पण आता या बँकेत मेगा भरती होणार आहे. चालू वर्षात मोठ्या संख्येत बँकेचे कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने मोठ्या प्रमाणात नवीन स्टाफ भरती करण्याची बँकेला गरज पडणार आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया या आर्थिक वर्षात ७२०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. बँकेचे एकूण ८१०० कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बँकेचा भर असेल तो मोठ्या प्रमाणात नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यावर आणि त्याचा ग्राहकांना फायदा उपलब्ध करून देण्यावर असेल.
सध्या, अशा कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे ज्यासाठी फार शिक्षणाची आवश्यकता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी बँकेने नवीन मशीन्सही वापरण्याच्या तयारीत आहे.

‘मॅकिन्स्की इंडिया’ने दिलेल्या माहितीनसार, २०२० पर्यंत या बँकेचे ७५ टक्के वरिष्ठ मॅनेजर सेवानिवृत्त होतील. स्टेट बँक ऑफ इंडियाचे डीएमडी जे. एन. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये बँक १८३७ पीओ आणि ५४०० असिस्टंट ऑफिसर पदांवरदेखील भरती जाहीर करू शकते.

Leave a Comment