स्पेानला सलामीच्या लढतीत धक्का

fifa2014

साल्वाडोर – फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीलाच चुरशीचा सामना पहावयास मिळवला. ब गटातील लढतीत गतविजेत्या स्पेवनला धक्काु देत हॉलंड संघाने ५-१ असा धुव्वा उडवित विजयी सलामी दिली. वर्ल्डकपच्या इतिहासातील मागील ५१ वर्षांत गतविजेत्या स्पेनला पत्करावा लागलेला हा सर्वांत मोठा पराभव आहे. त्यामुळे आता स्पेन संघाला येत्या सामन्यात चांगला खेळ करावा लागणार आहे.

या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणा-या स्पेनचे पारडे जड होते. मात्र, त्यांनी सलामीच्याच लढतीत साफ निराशा केली. हॉलंडच्या आक्रमणापुढे गोंधळलेला स्पेनचा संघ अगदीच शाळकरी संघ वाटत होता. याचा फायदा उचलला तो रॉबिन वॅन पर्सी आणि अर्येन रॉबेन यांनी. दोघांनीही प्रत्येकी दोन गोल केले, तर स्टिफन डी व्रिजने एक गोल केला. स्पेनकडून एकमात्र गोल झॅबी अलोन्सोने केला.

लढतीच्या बाराव्या मिनिटाला स्पेनला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, इनिएस्टाला या संधीचे सोने करता आले नाही. जागतिक रँकिंगमध्ये १५व्या क्रमांकावर असणाऱ्या हॉलंडवर सुरुवातीला त्यांना दबाव ठेवण्यात यश आले होते. त्यातच पंच निकोला रिझ्झोलीच्या शंकास्पद निर्णयामुळे स्पेनला पेनल्टी मिळाली. व्रिजने स्पेनच्या दिएगो कोस्टाला जाणुनबुजून पाडल्याने, ही पेनल्टी देण्यात आली. मात्र, रिप्लेत चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात हे झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मिळालेल्या पेनल्टीचा फायदा घेत २७व्या मिनिटाला अलोन्सोने त्यावर गोल करून स्पेनला आघाडी मिळवून दिली. यानंतर मध्यांतरला ९० सेकंद शिल्लक असताना डेली ब्लिंडच्या पासवर पर्सीने हवेत झेप घेत हेडरद्वारे अफलातून गोल केला.

लढतीच्या ५३व्या मिनिटाला रॉबेनने स्पेनच्या दोन खेळाडू आणि गोलकीपरला चकवून अफलातून गोल करून हॉलंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ६४व्या मिनिटाला व्रिजने हेडरद्वारे गोल करून हॉलंडची आघाडी ३-१ने भक्कम केली. सर्जिओ रामोसने गोलकीपर कॅसिलसकडे बॅकपास दिला. मात्र, त्याला हा बॅकपास व्यवस्थित घेता आला नाही. चेंडू पायाला लागून लांब गेला. चेंडूच्या मागेच धावत असलेल्या पर्सीने (७२ मि.) कॅसिलसच्या या चुकीचा फायदा घेत चेंडूला सहज गोल पोस्टमध्ये पाठवले.

Leave a Comment