सरकार आमचेच येणार ;मुख्यमंत्र्याचा विश्वास

chavan3
मुंबई – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा राज्यात सुपडा होवूनही विधानसभा निवडणुकीत आमचीच सरशी होणार असल्याचा दावा आघाडीकडून करण्यात येत आहे. त्याला रविवारी मुख्यमंत्र्यांनीही दुजोरा देताना आघाडी सरकार चौथ्यांदा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यासोबतच राज्यात आघाडी सरकार चौथ्यांदा सत्तेत येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या अधिवेशनाची शनिवारी समाप्ती झाली, त्यानंतर आज ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

जागा वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जागा वाटपाचा प्रश्न प्रत्यक्ष मतदार संघातील राजकीय बलाबल तसेच नेतृत्वातील सामंजस्याने घेईल. लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएला मिळालेल्या यशामुळे राज्यातील आघाडीवर कोणत्याही प्रकारचा दबाव आलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले .