मुरली कार्तिकने केली निवृत्तीची घोषणा

murlikartik

नवी दिल्ली – टीम इंडियाचा एकेकाळचा फेमस फिरकीपटू मुरली कार्तिकने पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली. निवती जाहीर करीत असताना मुरली कार्तिकसोबत त्याची पत्नी आणि वडील सोबत होते. त्यामुळे आगामी काळात आता मुरली कार्तिक स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असे दिसत आहे.

मुरली कार्तीक हा वयाच्याु ११ व्या वर्षापासून क्रिकेट खेळतो. टीम इंडियात स्थान मिळवण्यापूर्वी त्याने रणजी सामन्यातून त्याच्या खेळाची चुणूक दाखवून दिली आहे. टीम इंडियाकडून खेळल्यानंतर कार्तिक हा आयपीएलध्येे किंग्ज इलेव्हन पंजाब कडून खेळतो. पत्रकार परिषदेमध्ये त्याने परिवारातील सदस्यांचे आभार मानले.

कार्तिकने भारताकडून १९९९ ते २००७ या कालावधीत आठ कसोटी सामन्यामध्येे २४ तर एकदिवसीय सामन्यामध्ये ३७ विकेट मिळविल्या आहेत. २००७ नंतर मुरली कार्तिकला टीम इंडियात संधी देण्यात आली नसल्याने त्याने निवृत्तीची घोषणा केली.

Leave a Comment