कुमार संगकाराचे इंग्लंडविरुद्ध शतक

sangkkara

लंडनः कुमार संगकाराने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक केल्याने श्रीलंकेने तिस-या दिवशी ७ बाद ४१५ धावा केल्या होत्या. संगकाराने १४६, तर अँजेलो मॅथ्यूज ५७ धावांवर खेळत होते. इंग्लंडने उभारलेल्या ९ बाद ५७५ या धावाच्या डोंगरला श्रीलंकेने प्रत्युत्‍तर देताना दिवसाअखेर ४१५ धावा केल्या आहेत.

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्डसवरील संगकाराचे हे पहिले शतक. तर कसोटी का‌रकिर्दीतील ३६वे शतक. सर्वाधिक कसोटी शतके करणा-या फलंदाजांमध्ये संगकारा आता चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने राहुल द्रविडशी (३६ शतके) बरोबरी केली आहे. तत्पुर्वी दमदार फलंदाजी करताना कुशल सिल्वा ६३, जयवर्धन ५५, मॅथ्यूज नाबाद ५७ यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली.

दुसरीकडे नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करणा-या इंग्लंड संघाने ९ बाद ५७५ धावा केल्याी आहेत. त्यांच्या या धावांच्या डोंगराला चोख प्रत्युत्तर देताना श्रीलंकेची धावसंख्‍या दिवसाअखेर ७ बाद ४१५ एवढी झाली होती.

Leave a Comment