कसला मतदारसंघ ,अख्खा महाराष्ट्र माझा – राज ठाकरे

rajthakare_9
मुंबई – मी निवडणूक लढवायचे जाहीर केले नाही तोच कुठून लढणार असे प्रश्न केले जात आहे पण माझ्या दृष्टीने राज्यातल्या २८८ मतदारसंघातला कुठलाच एक मतदारसंघ माझा नाही, तर हा संपूर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे, अशी गर्जना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मनसेचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या विधानसभेतील भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले ,त्यावेळी राज ठाकरे बोलत होते. यावेळी मात्र त्यांनी कुठून लढणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवले. राज ठाकरे म्हणाले ,फक्त आमदार म्हणून निवडून येण्यासाठी नाही तर, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी निवडणुक लढवणार असल्याचे ते म्हणाले.

केवळ आमदार होण्यात मला रस नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यात रस आहे. महाराष्ट्राबाबत माझे काय स्वप्न आहे , हे जुलै किंवा ऑगस्टमध्ये आपल्यासमोर येईल,असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी राज ठाकरे यांनी पून्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी आपण उत्सुक असल्याचे अप्रत्यक्षपणे जाहीर केले. तसेच यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांवरही टीकेची झोड उडवली. विधानसभेचे सभागृह हे सर्वसामान्याचे प्रश्न मांडण्यासाठी. मात्र, अनेक आमदार येथे जनतेचे प्रश्न मांडण्यापेक्षा भाषणे करण्यात आणि वादावादी करण्यात वेळ वाया घालवत असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

Leave a Comment