आता पोलिस विभागाला सुचले ‘ उशिरा शहाणपण’

maria
मुंबई – पोलिस भरतीसाठी घेण्यात आलेल्या मैदानी परीक्षेत चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याने आता पोलिस विभागाला उशिरा शहाणपण सुचले आहे, आता म्हणे यापुढे भर उन्हात भरती प्रक्रिया घ्यायची नाहीत असा फतवा मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी काढला आहे.

उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचण्या सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळी घ्या. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, विश्रांतीसाठी योग्य ती जागा तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना मारिया यांनी दिल्या. भरती प्रक्रियेविषयी उमेदवारांच्या तक्रारी असतील तर त्यांची नोंद करून घ्या, असे आदेशही मारिया यांनी दिले आहेत.

मुंबई पोलीस दलातील भरतीसीठी द्याव्या लागणाऱ्या मैदानी परीक्षेच्या दरम्यान विक्रोळी व नवी मुंबईतील भरती केंद्रावर गेल्या आठवड्याभरात चार उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस दलाविरोधात प्रचंड संताप खदखदत होता. याची दखल घेऊन राकेश मारिया यांनी विक्रोळी येथील भरती केंद्राला भेट दिली. येथील परिस्थितीची पाहणी केली.

Leave a Comment