पाकिस्तानला भूकंपाचा धक्का

pak
इस्लामाबाद – वायव्य पाकिस्तानला शनिवारी सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.0 इतकी मोजण्यात आली आहे.भूकंपामुळे अद्याप कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तान हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान-अफगणिस्तान सीमेवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची शक्यता आहे.पाकिस्तानच्या वायव्य दिशेला असलेल्या पेशावरसह सर्वच शहरांना या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपानंतर भीतीने नागरिक रस्त्यावर उतरले होते. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताला सप्टेंबर 2013 मध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात 376 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment