धुम्रपानात कोलकाता देशात अव्वल

kolkotta
कोलकाता – आयसीआयसीआय टोबॅको कंझम्शन हॅबिट २०१४ अंतर्गत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देशात कोलकाता शहर सिगरेट खपात अव्वलस्थानी असल्याचे दिसून आले आहे. या शहरात धुम्रपान करणारी प्रत्येक व्यक्ती दिवसाला ९ ते १० सिगरेट ओढतात तर मुंबईत हेच प्रमाण ६ ते ७ सिगरेट असे आहे.

४४ टकके कोलकातावासियांनी गेल्या २-३ वर्षात त्यांच्या धुम्रपानाचे प्रमाण वाढल्याचे कबूल केले आहे आणि त्यांचा आठवड्याला सिगरेटवर होणारा सरासरी खर्च आहे ३४८ रूपये. बहुसंख्यांनी ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी धुम्रपान करत असल्याचे सांगितले आहे आणि मुख्यत्वे ऑफिसमध्ये कामावर जाण्यापूर्वी आणि काम संपवून परतताना सिगरेट ओढल्या जात असल्याचेही नमूद केले आहे.

सिगरेट अथवा अन्य तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास घातक आहेत आणि त्याच्या सेवनामुळे फुफ्फुस, तोंड, घसा यांचा कॅन्सर होतो याबाबत ९३ टक्के लोकांना माहिती आहे मात्र धुम्रपानाची सवय सुटावी यासाठी प्रयत्न करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले आहे. विशेष म्हणजे यातील ६४ टक्के लोकांनी आरोग्यविमाही घेतलेला नाही. हे सर्वेक्षण कोलकाता, मुंबई, लखनौ, अहमदाबाद आणि हैद्राबाद या शहरात करण्यात आले.

Leave a Comment