पुण्यात उभारणार क्रांतिकारकांचे संग्रहालय

tilak
पुणे – .नवीन पिढीला क्रांतिकारकांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी पुण्यात क्रांतिकारकांचे संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा टिळक वाडा येथे करण्यात आली .लोकमान्य टिळक यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्याच्या घटनेस शंभर वर्षे होत असल्याच्या निमित्ताने टिळकवाडा येथे लोकमान्य टिळक स्मृती अभियान आणि लोकमान्य टिळक विचार मंच यांच्यातर्फे क्रांतीकारकांच्या वंशजांचा सत्कार करण्यात आला,त्यावेळी दैनिक केसरीचे मुख्य विश्वस्त आणि संपादक डॉ दीपक टिळक यांनी या संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर महापौर चंचला कोद्रे ,खासदार अनिल शिरोळे ,कार्यक्रमाचे संयोजक शैलेश टिळक ,नगरसेविका मुक्ता टिळक ,दैनिक बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर ,रोहित टिळक ,हिमानी सावरकर आदी उपस्थित होते.

यावेळी क्रांतिकारकांच्या वंशजांचा गौरव करण्यात आला ,त्यामध्ये हरीभाऊ लिमये , ,महंमद सैद खान ,प्रशांत कर्वे ,सरबजीत नामधारी ,राजकुमारी कुसुम, चेतन आणि प्रशांत चाफेकर ,रवींद्र पिंगळे ,शशिधर कान्हेरे , जगमोहन आणि अभितेजसिंग ,सत्यशील राजगुरू ,नंदिनी रेडे ,जयंती चांदोरकर ,असीम राठोड ,विजय सिसोदिया ,राजेंद्रनाथ बक्षी ,उदय खत्री ,मारुती सैद ,डॉ राकेश रंजन ,डी . पी राघव , सुनिता गोगटे ,विरेन खोत ,मधु शर्मा यांचा समावेश होता.क्रांतिकारकांचे संग्रहालय उभारण्याची योजना तयार करण्यात आली असून त्याचा आराखडाही बनविण्यात आलेला आहे. हे संग्रहालय उभारल्यानंतर तरुण पिढीला क्रांतिकारकांच्या आठवणी कायम राहतील. असे डॉ टिळक यांनी सांगितले.
महापौर चंचला कोद्रे म्हणाल्या . की आपला इतिहास काय आहे ,याची माहिती अशा उपक्रमातून नव्या पिढीला मिळणार आहे.
——————————————————————————————————–

… आणि टिळक वाडा शहारला

शहीद भगतसिंग यांचे अस्थिकलश आणि वेशभूषेतील लोकमान्य टिळक यांचे टिळक वाड्यात आगमन होताच विविध घोषणांनी टिळक वाडा निनादून गेला. क्रांतिकारकांच्या वंशजांचे स्वागत टिळक परिवारातर्फे करण्यात आले.तसेच क्रांतिकारकांच्या वंशजानी केसरी वाड्यातील लोकमान्य टिळक संग्रहालयाला भेट दिली.

Leave a Comment