डॉ. दाभोलकरांच्या हत्येशी हिंदू राष्ट्र सेनेंचा संबंध ?,तपास होऊ शकतो

dabholkar
मुंबई – पुण्यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या हत्येच्या आरोपावरून हिंदू राष्ट्र सेनेच्या 13 कार्यकर्त्यांना 4 जून रोजी अटक करण्यात आली असून . मोहसीन सादिक या मुस्लिम तरुणाची हिंदू राष्ट्र सेनेच्या टोळक्याकडून हत्या करण्यात आल्याने हिंदू राष्ट्र सेनेचा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येशी काही संबंध आहे का,? असा प्रश्न गृहमंत्री आर. आर पाटील यांना विचारण्यात आला आहे. त्याला उत्तर देताना तपास होऊ शकतो असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

आमदार कपिल पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे .डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या हत्येला नऊ महिने उलटून गेले आहेत मात्र, त्यांच्या मारेक-यांचा तपास लागलेला नाही.
पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. मात्र मोहसीन सादिक याच्या हत्येप्रकरणी पकडण्यात आलेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांचा काही संबंध आहे का ?अशी विचारणा करण्यात आल्याने गृहमंत्री पाटील यांनीही त्या दृष्टीने तपास केला जाऊ शकतो, असे उत्तर दिले आहे.

Leave a Comment