आयकर सूट मर्यांदा पाच लाखांवर ?

tax
दिल्ली – मोदी सरकारने हाती घेतलेल्या आर्थिक निती सुधारणांतर्गत कार्यक्रमात आयकर सूट मर्यादा सध्याच्या २ लाखांवरून ५ लाखांवर नेण्याबाबत विचार सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या संदर्भातला अहवाल प्रत्यक्ष कर बोर्डाकडे मागितला गेला असून २० जूनपर्यंत हा अहवाल बोर्डाने सरकारला सूपूर्द करायचा आहे. नंतर त्यावर विचार करून आयकर सूट मर्यादा वाढविण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना या संबंधीची घोषणा केली जाईल असेही समजते.

आयकराची मर्यादा वाढविली गेली तर मोदी सरकारसाठी तो ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. गेली अनेक वर्षे समाजाच्या सर्व थरातून आयकर मर्यादा वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती मात्र ती मान्य होऊ शकली नव्हती. आता ही मर्यादा वाढली तर ती मोठी करसुधारणा ठरणार आहे. याचबरोबर गृहकर्ज आणि आरोग्य विमा यांच्यावरील कर सवलतीची सीमा वाढविण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment