सोन्यापाठोपाठ चांदीही कोसळणार

goldsilver
मुंबई – युरोपमधील अजूनही रूळावर न येऊ शकलेली अर्थव्यवस्था आणि अ्पेक्षेइतका न वाढलेला चीनचा विकासदर यामुळे चांदीची मागणीही कमी झाली असून सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही कोसळतील आणि ते किलोला ३९ हजारांपर्यंत येतील असे केडिया कमोडिटीचे अजय केडिया यांचे मत आहे. भारतात साधारणपणे सोने आणि चांदीचे दर बरोबरीनेच कमी जास्त होत असतात. गेल्या आठ महिन्यांत सोन्याचे दर ८ हजारांनी घसरले आहेत. त्यातच भारत सरकारने सोने आयातीवरील निर्बंधात कांही सूट दिल्याने गुंतवणूकदार चांदीऐवजी पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील असेही त्यांचे म्हणणे आहे.

गेले तीन महिने आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीत घसरण सुरू असून ती सध्या २० डॉलर्सच्या आत आहे. हे भाव आणखी कमी होऊन ते १८.५० डॉलर्सवर येतील व पुढेही ही घसरण सुरू राहील असा त्यांचा अंदाज आहे. युक्रेनमधील तणाव आता निवळत चालला आहे त्याचाही परिणाम सोने चांदी दरांवर होऊ शकतो असाही एक अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment