राष्ट्रप्रमुख कमाईत मोदीं १२ नंबरवर

modi5
भाजपने लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रदर्शन करून एकहाती सत्ता प्राप्त केल्याने पंतप्रधान मोदी जगातील टॉपचे नेते बनले असले तरी कमाईच्या बाबतीत मात्र त्यांचा नंबर बराच खाली असल्याचे पे चेक इंडिया वेबसाईटने प्रसिद्ध केले आहे.

या साईटवर जगातील प्रमुख राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक पगार दिले गेले आहेत. त्यानुसार जगात सर्वाधिक पगार रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांना दिला जातो. त्याचा पगार रूपयांत १९ कोटी २२ लाख रूपये इतका आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांना १ कोटी ६६ लाख रूपये मिळतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल या दोघांनाही समान म्हणजे २ कोटी ३३ लाख रूपये पगार मिळतो.

चीनचे राष्ट्रपती जिंगपिग हे या यादीत मोदींच्या पुढे म्हणजे ११ व्या स्थानावर असून त्यांना वर्षाला २३ लाख ३४ हजार रूपये पगार मिळतो. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा पगार आहे १८ लाख रूपये तर पंतप्रधान मोदी यांचा पगार आहे १९ लाख रूपये.

Leave a Comment