ओबामांचे हेल्थकार्ड – राष्ट्राध्यक्ष तंदुरूस्त

obama
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे पूर्णपणे तंदुरूस्त आहेत आणि त्यांची राष्ट्राध्यक्षपदाची मुदत संपेपर्यंत ते असेच तंदुरूस्त असतील असे फिजिशियन डॉ. रोनी जॅकसन यांनी जाहीर केले आहे. तीन वर्षांनंतर ओबामांच्या सर्व शारिरीक तपासण्या केल्या गेल्या त्या तपासण्याच्या संबंधाने ही माहिती दिली गेली आहे. डॉ. रोनी हे व्हाईट हाऊसच्या मेडिकल युनिटचे डायरेक्टर आहेत आणि ओबामांचे फिजिशियनही आहेत.

ओबामा यांच्या शारिरीक तपासण्या आक्टोबर २०११ मध्ये केल्या गेल्या होत्या त्यानंतर आता त्या पुन्हा मे २०१४ मध्ये केल्या गेल्या. अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांची तब्येत कशी आहे, त्यांच्या आरोग्याची स्थिती कशी आहे याची माहिती अमेरिकन जनतेला मिळावी म्हणून या चाचण्यांचे अहवाल जाहीर केले गेले असल्याचे समजते.

डॉ.रोनी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ओबामा रोज हेल्दी डाएट घेतात, नियमाने व्यायाम करतात आणि तंबाखूचे सेवन करत नाहीत. क्वचित प्रसंगी मद्दपान तेही प्रमाणात करतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रिया यापूर्वी झालेल्या नाहीत तसेच त्यांना कोणताही आजार नाही. वयानुरूप त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. मात्र डी व्हिटॅमिनची थोडी कमतरता असल्याने त्याची औषधे ते घेतात. क्वचित प्रसंगी ते निकोटीन गम वापरतात. ओबामांचे वजन १८० पौंड असून उंची आहे ६ फूट १ इंच.

Leave a Comment