१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी ‘दाऊद’चा मृत्यू

1993
मुंबई – १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा जे.जे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दाऊद फणसे ९० वर्षांचा होता. दाऊदने बॉम्बस्फोटासाठी मुंबईत आरडीएक्स आणले होते. या आरोपाखाली दाऊदला विशेष टाडा न्यायलायाने शिक्षा सुनावलेली होती. दाऊदने न्यायलायात त्याचा गुन्हा कबुल केला असल्याने त्याला या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. तसेच दाऊदला या गुन्ह्याअंतर्गत जन्मठेप आणि २ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठविण्यात आली होती. ११९३च्या मुंबईसाखळी बॉम्बस्फोटात दाऊद फणसे, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि याकुब मेमन यांचाही हात होता. स्फोटासाठी लागणारे आरडीएक्स मुंबईत आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेवरच होती. त्यामुळे दाऊदने रायगड जिल्ह्यातून शेकडी बंदरावरून आरडीएक्स मुंबईत आणले होते.

Leave a Comment