जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यूने त्यांची नवी आय एट ही हायब्रीड स्पोर्टस कार युनायटेड अरब अमिरातीत सादर केली आहे. या कारसाठी एरोडायनामिक डिझाईन केले गेले आहे व यामुळे ती २.१ लिटर इंधनात १०० किमी धावू शकणार आहे. तसेच केवळ ४.४ सेकंदात १०० किमीचा वेग पकडू शकणार आहे.
बीएमडब्ल्यूची आय ८ युएईमध्ये लाँच
या गाडीचा वरचा भाग कार्बन फायबरपासून तर खालचा भाग अॅल्युमिनियम पासून बनविला गेला आहे. विशेष म्हणजे ही कार विना पेट्रोल आणि वीज ३७ किमीचे अंतर कापू शकते. या गाडीला बसविल्या गेलेल्या लिथियम बॅटरी घरच्याघरी चार्ज करता येतात. गाडीचे हेडलाईट लेजर टेक्नॉलॉजीने युक्त असल्याने सर्वसाधारण गाड्यांच्या हेडलाईटपेक्षा दुप्पट प्रकाश देतात असे सांगितले जात आहे.
या कारची विक्री म्युनिचमध्ये यापूर्वीच सुरू करण्यात आली असून तिची किंमत आहे १,३५,७०० डॉलर्स. भारतात ही कार लाँच होईल तेव्हा तिची किंमत २ कोटी रूपयांपेक्षा अधिक असेल असा जाणकारांचा अंदाज आहे.