आषाढी वारी – यंदा दोन ठिकाणी पालखी तळ बदलणार

warkari
पुणे – आषाढी वारीत सहभागी होणार्‍या वारकर्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याने यंदाच्या वर्षी पालखी मार्गावरील काही तळ बदलले जाणार आहेत.वाटेत पाऊस अधिक पडल्यास काही तळ चिखलमय होतात आणि विसाव्यासाठी वारकर्‍यांना अडचणी येतात, त्यामुळे तळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा 19 जूनला देहू येथून संत तुकोबांचा तर 20 जूनपासून आळंदीहून माउलींचा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. वारी सोहळ्यासाठी लाखो वारकर्‍यांचे आगमन होते. काही दिंड्या येण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या तयारीवर अखेरचा हात फिरवण्यात देवस्थान समितीचे पदाधिकारी, पोलिस यंत्रणा, आरोग्य खाते मग्न झाले आहेत .नियोजनाच्या दृष्टीने काय बदल हवे याची चाचपणी केली जात आहे. त्यानुसार जेजुरी आणि नातेपुते येथे तळ बदलले जाणार आहेत. वारीत सहभागी होणार्‍या वारकर्‍यांचा तसेच माउलींच्या रथाचा पन्नास लाख रुपयांचा विमा देवस्थानच्या वतीने उतरवण्यात येणार आहे. या वर्षीपासून स्वच्छता पाळणार्‍या ग्रामपंचायतीला देवस्थानतर्फे दहा हजार रुपये देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे .

Leave a Comment