मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला असून देशातील एकूण ११२२ उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत.गौरव अग्रवाल याने संपूर्ण देशातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर मनिष शर्मा आणि रचित राज यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावण्यात यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या विपिन इटणकरने देशातून १४ वा क्रमांक पटकावला आहे.
‘यूपीएससी’मध्ये ११२२ जणांची बाजी ; गौरव अग्रवाल देशात पहिला
देशातील एकूण ११२२ उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यंदाच्या निकालात महाराष्ट्रालाही मोठे यश मिळाले आहे. आयएएस(१८०), आयपीएस(१५०), आय़एफएस(३२), सेंट्रल सर्व्हिस(ए)(७१०) आणि सेंट्रल सर्व्हिस(बी)(१५६) या एकूण १२२८ जागांसाठी घेतलेल्या परीक्षेत ११२२ उमेदवारांना यश मिळाले आहे. एकूण ११२२ उमेदवारांपैकी सर्वसाधारण गटातील५१७, मागासवर्गीय़ जातीतील ३२६, अनुसूचित जाती१८७ आणि अनुसूचित जमातीतील ९२ उमेदवारांना यश मिळाले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये ही यूपीएससीची लिखित परीक्षा घेण्यात आली होती. तर एप्रिल -जून दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती परीक्षा घेण्यात आल्या होत्या.