भारताच्या निर्यातीत १२ टक्के वाढ

export
नवी दिल्ली – गेल्या दोन-तीन वर्षात कमी झालेली भारताची निर्यात मे मध्ये वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षात निर्यातीला दोन आकडी संख्या गाठता आली नव्हती. ती १० टक्क्याच्या आतच होती, पण मे मध्ये ती १२.४ टक्के झाली आहे. मे मध्ये भारतातून २८ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. याच महिन्यात आयात ११.२३ टक्क्यांनी घटून ३९.२३ अब्ज डॉलर्सवर आली.

या प्रगतीमुळे मे महिन्यातला व्यापार तोटा कमी झाला. विशेषत: सोन्याची आयात ७२ टक्क्यांनी घटली. तशी ती घट २.१३ हे पूर्ण वर्षभर जारी होती, पण या महिन्यात ती थोडी वाढली. अर्थात ही वाढ लग्नसराईमुळे झाली आहे. मात्र एकंदरीत सोन्याची आयात घटत आहे.निर्यातीत झालेली वाढ मशिनरी, औषधी, तयार कपडे, पेट्रोलियम उत्पादने, रसायने यांच्या वाढत्या उत्पादनामुळे आणि निर्यातीमुळे झाली आहे.