फूटबॉल वर्ल्डकप – गूगलवर खास डूडल

google
फूटबॉल वर्ल्डकपचा फिवर गूगलवरही पहायला मिळत आहे. गूगलने फूटबॉल वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर आपल्या होमपेजवर खास डूडल तयार केले आहे. आजपासून (गुरूवार) सुरू होणा-या फुटबॉलच्या महासंग्रामाची सर्व क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. गूगल ‘डूडल’लाही याची भुरळ पडली आहे. गूगलच्या होमपेजवरील या ‘डूडल’वर क्लिक केल्यास तेथे फूटबॉलसहित बॅकग्राऊंडमध्ये बदल होण्यास सुरूवात होते. तसेच ब्राझीलमधील प्रसिद्ध ठिकाणांचे दृश्य या डूडल मध्ये पहायला मिळत आहे.