प्रवासी वाहतूकीचे मुंबई मेट्रोने केले रेकॉर्ड

metro
मुंबई – अवघ्या ५९ तासात १० लाखांहून अधिक प्रवाशांची नेआण करून मुंबई मेट्रोने रेकार्ड नोंदविले असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. वर्सोवा ते घाटकोपर या अंतरावर सुरू झालेल्या मेट्रोने दिल्ली मेट्रोच्या तुलनेत दुप्पट प्रवासी वाहतूक केली आहे.

गेल्या आठवड्यात म्हणजे ८ जूनला मुंबईत मेट्रोचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. भाडेवाढीवरून या उद्घाटनाला वादाचे गालबोटही लागले होते. मात्र सर्वसामान्य प्रवाशांनी मेट्रोच्या प्रवासास प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे. ही मेट्रो मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे चालविली जाणार आहे. या कंपनीने पहिल्या महिन्यासाठी प्रवाशांना कांही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पहिले ३० दिवस एकतर्फी प्रवासासाठी प्रवाशांना १० रूपयांत तिकीट दिले जाणार आहे.

1 thought on “प्रवासी वाहतूकीचे मुंबई मेट्रोने केले रेकॉर्ड”

Leave a Comment