खवळलेल्या समुद्राचे पाणी रस्त्यांवर

mumbai
मुंबई – मुंबईच्या पश्चिमेला असणा-या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने अरबी समुद्राच्या मध्यात मान्सून सक्रिय झाला आहे. परिणामी समुद्र खवळला असून, मुंबईतील शिवाजी पार्क, गेट वे ऑफ इंडियासह रस्त्या रस्त्यांवर पाणी आले . मुंबईतील विविध भागात समुद्राच्या लाटांचे पाणी आल्याने एकीकडे आश्यर्य व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे भीतीही व्यक्त केली जात आहे. तर पौर्णिमा असल्याने सुमद्राच्या लाटा उसळतात असे स्पष्टीकरण अभ्यासकांनी दिले आहे.

केरळच्या किनारपट्टीवर मागील आठवड्यात आलेल्या मान्सून वा-यांनी उत्तरेकडे वेगाने आगेकूच केल्याने मुंबई व परिसरातील समुद्र खवळला आहे. बुधवारी या वा-याने कोकणचा किनारा गाठला होता,आता तो मुंबईत पोहचला आहे. त्यामुळे मुंबई व परिसरात जोरदार पाऊस पडला. मात्र पावसापेक्षा शिवाजी पार्कसारख्या नागरी भागात पाणी आल्याने नागिरकांची घबराट उडाली . आजच्या पावसाने उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे संपूर्ण मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे.दरम्यान दादरमधील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या परिसराची पाहणी केली.

Leave a Comment