फिफा सामन्यांमुळे ब्राझीलला ४ अब्ज डॉलर्सचा महसूल

fifa
ब्राझील – दोन दिवसांनंतर सुरू होत असलेल्या वर्ल्ड कप फूटबॉलच्या सामन्यांतून ब्राझीलने तब्बल ४ अब्ज डॉलर्सचा महसूल गोळा केला असल्याचे समजते. २०१० साली दक्षिण आफ्रिकेत गोळा झालेल्या महसूलाच्या तुननेत हा महसूल ६६ टक्के जास्त आहे. यातील बहुसंख्य रक्कम प्रायोजकत्वाच्या माध्यमातून मिळाली आहे. सामन्यांचे मार्केटिंग हक्क विकून मिळालेला महसूल १.३५ अब्ज डॉलर्स इतका आहे.

या सामन्यांसाठी तीन प्रकारे प्रायोजकत्व दिले जाते. पहिले वर्ल्ड कप पार्टनर्स, दुसरे फिफा वर्ल्ड कप स्पॉन्सरर्स आणि तिसरे नॅशनल स्पोर्टस. स्पोर्टस प्रकारात आदिदास कंपनी १९७० पासून स्पॉन्सरर आहे. त्यांनी हे प्रायेाजकत्व करार करून २०३० सालापर्यंत वाढवून घेतले आहे. त्यापोटी दर चार वर्षांनी त्यांनी ७ कोटी डॉलर्स द्यायचे आहेत. अन्य प्रायोजक कंपन्यांत जागतिक कीर्तीची कार्ड कंपनी विसा, सोनी इलेक्ट्रोनिकस या फिफा पार्टनर म्हणून आहेत.

ह्युंडाई किया मोटर्स ही दक्षिण कोरियातील बलाढ्य कार उत्पादक कंपनी, दुबईची एअर कंपनी इमीरेटस, बियर व ब्रेवरीज उत्पादक कंपनी बडवायजर, ल्युब्रिकंट ऑईल उत्पादनातील अग्रेसर कॅस्ट्रॅल, काँटीनेंटल टायर कंपनी, हेल्थ केअर उत्पादनातील अग्रणी जॉन्सन अॅन्ड जॉन्सन, मॅकडोनाल्ड, फूड प्रोसेगिंक क्षेत्रातील मोय पार्क व सोलर पॅनल उत्पादनातील यिंगली सोलर या अन्य प्रायोजक कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या सामन्यादरम्यान त्यांच्या उत्पादनांच्या जाहिराती करू शकणार आहेत.

Leave a Comment