संगणकाने स्वतःला माणूस शाबित केले

laptop
रशियात बनलेल्या एका संगणकाने स्वतःला माणूस म्हणून शाबित करण्यात यश मिळविले असल्याचे वृत्त आहे. या बातमीने जगात खळबळ माजविली आहे. रशियातील ब्लादीमीर वेसलोव्ह यांच्या टीमने तयार केलेल्या एका प्रोग्रॅममुळे हे शक्य झाले असल्याचे समजते. या संगणकाने आत्तापर्यंत कोणताच संगणक जे करू शकला नाही ती ट्यूरिंग टेस्ट यशस्वीरित्या पास केली आहे. माणूस आणि संगणकात फरक करणारी ही टेस्ट एलन ट्यूरिंग यांनी तयार केली असून ती लँडमार्क मानली जाते.

या टेस्टमध्ये एकाचवेळी ३० हून अधिक तज्ञ संगणकाला विविध प्रश्नांची उत्तरे विचारतात. प्रश्नांची उत्तरे देताना विचार केल्याशिवाय ती देता येत नाहीत आणि संगणक स्वतः विचार करू शकत नसल्याने कोणताच संगणक ही टेस्ट आजपर्यंत पास होऊ शकलेला नाही. मात्र रशियातील संगणकासाठी तयार केलेल्या प्रोग्रॅममुळे ही टेस्ट सहज पास करता आली आहे. यासाठी हा संगणक १३ वर्षांचा मुलगा असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. त्याच्या वयानुसार ३३ तज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या संगणकाने अचूक दिली व त्यामुळे परिक्षा घेणार्‍यांना हा खरोखर मुलगाच असावा याची खात्री पटल्याचे सांगितले जात आहे.

मात्र यामुळे संगणक क्षेत्रातील जाणकारांना नवीनच चिंता सतावू लागली असून या तंत्रज्ञानाचा वापर सायबर क्षेत्रात वाईट कामांसाठी होऊ शकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment