सामंजस्याने तोडगा… नवाझ शरीफ यांचे मोदींना पत्र

modi3
नवी दिल्ली – भारत -पाकिस्तान या दोन देशांमध्ये प्रलंबित असलेल्या मुद्यांवर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी आपण उत्सुक आहोत असे पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

पत्रात म्हटले आहे कि ,व्दिपक्षीय आणि प्रादेशिक हिताच्या दृष्टीकोनातून आपल्यामध्ये जी अर्थपूर्ण वैचारिक देवाण-घेवाण झाली त्याने मी संतुष्ट झालो आहे. आपल्या समान आर्थिक कार्यक्रमाशी अनेक गरीबांची भवितव्ये जोडलेली आहेत असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मागच्या आठवडयाच्या अखेरीस पंतप्रधान कार्यालयाला नवाझ शरीफ यांचे हे पत्र मिळाले. २६ मे रोजी झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळयासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते. या सोहळयासाठी नवाझ शरीफही आले होते. शपथविधीनंतर दुस-याच दिवशी नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत दहशतवादासह अनेक महत्वाच्या व्दिपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली होती.

Leave a Comment