राहुल द्रविडच्या सासूबाईंना साखळीचोरांचा झटका

dravid
नागपूर- भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या सासुबाई जयश्री पेंढारकर यांना दिवसाढवळ्या साखळीचोरांनी झटका दिला असून त्यांचे २५ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. त्यासंबंधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली मात्र साखळी चोरांचा तपास लागू शकलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार जयश्री पेंढारकर त्यांचे पती सुरेंद्र यांच्यासह कामासाठी सकाळी बँकेत गेल्या होत्या. काम आटोपून त्या कारजवळ आल्या आणि कारमध्ये बसत असतानाच मोटरसायकलवरून आलेल्या दोघाजणांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. जयश्री यांनी प्रतिकार केल्यामुळे अर्धे मंगळसूत्र त्यांच्या हाती राहिले तर अर्धे चोरट्यांनी पळविले. पेंढारकर यांनी लगेचच त्यासंबंधी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल गेली.

Leave a Comment