गृहमंत्र्यांकडून अकार्यक्षमतेची कबुली !

patil
मुंबई – ओळखीच्या लोकांकडूनच बलात्कार होतात ,असा दावा राज्याच्या गृहमंत्र्यांनी केला आहे, त्यात बोल्ड जाहिराती आणि उत्तेजक छायाचित्र बलात्काराला कारणीभूत असून प्रत्येक घरात पोलिस दिला तरीही महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असे गृहमंत्री आर. आर . पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबईत झालेल्या महिला सुरक्षा परिषदेत गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य करून अकार्यक्षमता खुलेआम मांडली आहे. यावेळी आर. आर. पाटील म्हणाले , उत्तेजक छायाचित्रे आणि बोल्ड जाहिराती हे बलात्कारांचे प्रमुख कारण आहे. मात्र अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अत्याचार होण्याचे प्रमाण कमी आहे. पण प्रत्येक घरात पोलिस दिला तरीही महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत असेही ते म्हणाले. बलात्कार हे ओळखीच्याच व्यक्तींमुळे होतात, मग त्यात पोलिसांचा दोष कसा असा सवालही त्यांनी विचारला आहे .उपाययोजना करण्याबाबत ते म्हणाले, दोन महिन्यात महिला अधिकारीसह 500 वायरलेस वाहने तैनात करणार,मुंबईत एका महिन्यात 200 दुचाकीस्वार महिला कमांडोंचे पथक तैनात करणार तसेच चैन स्नॅचिंगविरोधात मोहीम, संकटातील महिलांना कमांडो पथक मदत करणार आणि दलित पीडितांचे गुन्हे न नोंदवल्यास सेवेतून हाकलण्याचा निर्णय तत्काळ घेतला जाईल असे ते म्हणाले.

Leave a Comment