उपग्रहांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात इंटरनेट सुविधा देण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतलेल्या गुगलने या कार्यक्रमाचे लॉचिंग पॅड म्हणून स्कायबॉक्स इमेजिंग कंपनी ५० कोटी डॉलर्समध्ये खरेदी केली असल्याचे वृत्त आहे. या कंपनीच्या सध्या पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या उपग्रहांची मालकीही या करारामुळे गुगलकडे आली आहे. यामुळे गुगलचा उपग्रहांचा स्वतःचा ताफा तयार होण्यास हातभार लागणार आहे. सध्या हे उपग्रह एरियल फोटोग्राफीसाठी वापरले जाणार आहेत असे समजते.
गुगलने स्कायबॉक्स इमेजिंगची केली खरेदी
गुगल डिजिटल मॅपची गुणवत्ता अधिक वाढण्यासाठी स्कायबॉकस च्या उपग्रहांची मोठी मदत मिळणार आहे. स्कायबॉक्सकडे डिटिजल ग्लोब, अॅस्ट्रीयम सारख्या सुमारे १००० स्त्रोताकडून माहिती मिळविण्याचे अधिकार आहेत तेही गुगलकडे येणार आहेत. त्याचबरोबर यामुळे जगाच्या दुर्गम भागात इंटरनेट सेवा पुरविण्याचा गुगलचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही कार्यान्वित होऊ शकणार आहे. गुगलने सध्या सुरू केलेल्या प्रोजेक्ट लून प्रकल्पांतर्गत अॅंटेनासह असलेले जेलीफिश बलून अवकाशात सोडण्यात आले आहेत. दोन महिन्यापूर्वीच गुगलने याच कारणासाठी टायटन एरोस्पेसची खरेदी केली आहे.