हिलरी किलंटन यांच्या हार्ड चॉईस पुस्तकाचे प्रकाशन

hillary
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांनी लिहिलेले हार्ड चॉईसेस हे पुस्तक आज म्हणजे १० जूनला प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून हिलरी यांनी २०१६ साली होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुका लक्षात घेऊन आपणही एक उमेदवार असू शकतो असे सूचित केले असल्याचे व त्यादृष्टीने मतदारांवर आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

आपल्या वैयक्तीक आणि वैवाहिक जीवनाविषयी कायम मौन पाळलेल्या हिलरी यांनी या पुस्तकात त्या परराष्ट्र मंत्री असताना केलेल्या कामाविषयी अधिक विस्तृत विवेचन करतानाच हे पुस्तक आपण जग बदलतेय याची जाणीव असलेल्या ससू अमेरिकनांसाठी लिहिले असल्याची मल्लीनाथी केली आहे. आपल्या प्रतिमेविषयी विशेष जागरूकता बाळगणार्‍या हिलरी यांनी त्यांचा विवेकशीलपणाही या पुस्तकातून व्यक्त केला असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ हिलरी राष्ट्राध्यक्ष असल्याची जाणीव करून देणारे असल्याचेही न्यूयार्क टाईम्सने नमूद केले आहे. हिलरी यांनी या पुस्तकात सर्वसामान्य जनतेशी मोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात कठीण प्रसंग येतात पण त्याचा सामना करायचा असतो असे सांगताताच त्यांनी आयुष्यात आव्हाने स्वीकारावीच लागतात असेही नमूद केले आहे. उदाहरण देताना त्यांनी आधी नोकरी मिळवायची आणि मग ती टिकवायची हे आव्हानच असते असेही लिहिले आहे. तसेच आपण कोणते शिक्षण घ्यायचे, कधी लग्न करायचे आणि मग किती काळ त्या विवाहबंधनात राहायचे याचे निर्णयही घ्यावेच लागतात असे सांगताना हिलरी यांनी माझा या बाबतचे दृष्टीकोन आणि अनुभव वाचकांना उपयुक्त ठरावेत अशी आशाही व्यक्त केली आहे.

नेते कसे असतात, राष्ट्रे कधी एकत्र काम करतात आणि कधी त्यांच्यात संघर्षही होतात. राजकीय नेत्यांचे या संदर्भातले निर्णय सर्वसामन्यांच्या आयुष्यावर काय परिणाम करतात याचेही विवेचन त्यांनी या पुस्तकात केले आहे आणि हाच भाग त्यांच्या भावी मतदारांवर प्रभाव टाकणारा ठरेल असे समीक्षकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment