यादव यांची वादग्रस्त पुस्तके नष्ट करण्याचे आदेश

yadav
मुंबई – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम यांची बदनामी करणारी ज्येष्ठ लेखक आनंद यादव यांची पुस्तके फाडून नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी लेखक यादव आणि प्रकाशक सुनील मेहेता यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या या निर्णयाने साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे.

आनंद यादव यांनी लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर या पुस्तकात या दोन्ही संतांबाबत अवमानकारक मजकूर असल्याचा आरोप करून तुकाराम महाराजांचे वंशज जयसिंह मोरे यांनी येथील न्यायदंडाधिक-यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. या पुस्तकातीला वादग्रस्त मजकुराची सत्यता पटविणारे पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने लेखक आणि प्रकाशकांना दिले होते. मात्र अशा प्रकारचे कोणतेही पुरावे यादव अथवा मेहता यांनी सादर केले नाहीत.त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाने ही पुस्तके फाडून नष्ट करण्याचे आणि लेखक, प्रकाशकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment