
कराची – पाकिस्तानमधील कराची विमानतळावरील एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्सच्या चेकपोस्टवर दहशतवाद्यांनी मंगळवारी पुन्हा हल्ला केल्याचे वृत्त आहे. जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या एअरपोर्ट सिक्युरिटी कँप क्रमांक दोन येथे मोठ्या प्रमाणावर चकमक सुरु असल्याचे ‘डॉन’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तर चार ते पाच दहशतवाद्यांनी पेहलवान गोथच्या बाजूने हल्ला केल्याचे जियो ने म्हटले आहे.यामुळे येथील सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आल्याचे स्थानिक वृत्तवाहिनी जियो ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानात पुन्हा हल्ला
कँपबाहेर दहशतवादी आणि एएसएफच्या जवानांमध्ये चकमक सुरु आहे. अधूनमधून स्फोटकांचा आवाजही ऐकायला येत आहे. येथे इमर्जन्सी घोषित करण्यात आली असून या परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.कराची शहरातील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी रविवारी रात्री भीषण हल्ला केला होता.
