लता मंगेशकरांच्या ‘ट्विट ‘मुळे नवा वाद

latamangeshkar_2
मुंबई – पेडर रोडवर मंजूर झालेल्या फ्लॉय ओव्हर ब्रिजला विरोध करून ब्रिज बांधला तर आपण येथे राहणे सोडून देऊ अशी भूमिका घेवून सरकारची कोंडी करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कॅम्पा-कोला सोसायटीबाबत केलेल्या ट्विटमुळे आणखी एक नवा वाद ओढवून घेतला आहे.त्यातही रहिवाश्यांच्या हितासाठी आग्रह धरणाऱ्या लतादीदींचे ‘कॅम्पा-कोला’तच सदनिका असल्याचे उघडकीस आले आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांनी कॅम्पा-कोला सोसायटीबाबत घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावरच टीका होऊ लागली आहे. बिल्डराच्या चुकीची शिक्षा सामान्य रहिवाशांना नको असे टि्वट करून लतादीदींनी स्वत:वरच वाद ओढावून घेतला आहे. पण त्यांच्या ट्विट मागे कॅम्पाकोला सोसायटीतील इशा-एकता इमारतीत लता मंगेशकर यांच्या नावाने 802 क्रमांकाचा एक फ्लॅट आहे. त्यामुळे स्वत:चा फ्लॅट वाचवण्यासाठी लतादीदी कॅम्पा कोलातील रहिवाशांचे समर्थन तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे परिणामी विविध स्तरातून टीका होऊ लागली आहे.

लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विट नुसार त्यांनी म्हटले आहे कि, कॅम्पा कोला सोसायटीच्या संदर्भात मी महाराष्ट्र सरकारशी बोलू इच्छित आहे. या इमारतीच्या रहिवाशांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा समावेश आहे. ही इमारत तोडली तर हजारो जण बेघर होतील. आतापर्यंत घर सोडावे लागणार या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बिल्डराच्या चुकीची शिक्षा सामान्य रहिवाशांना मोजावी लागायला नको तो त्यांच्यावर अन्याय ठरेल, असे लतादीदींनी म्हटले आहे. त्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी लतादीदींनी फक्त स्वत:साठी न बोलता त्यांनी गरिबांसाठी पण आवाज उठविला पाहिजे. कॅम्पा कोला पाडताना लतादीदी त्यांच्या पाठिशी उभ्या राहत आहेत; पण गरीबांच्या झोपड्या पाडताना व त्यांना तेथून हाकलून देताना, बेघर होताना त्यांना कसे दिसत नाही असा सवाल केला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment