रिस्ट बँडप्रमाणे घाला क्रेडीट कार्ड

cc
लंडन – क्रेडीट कार्ड ही आजच्या जीवनाची अत्यावश्यक गरज असली तरी क्रेडीट कार्ड हरविण्याची भीती युजरच्या मनात सतत असते. लंडनमधील बर्कले मल्टीनॅशनल बँकींग आणि फायनान्स सर्व्हीसेस कंपनीने ग्राहकाच्या ही भीती कायमची घालवून टाकण्याची उपाययोजना केली आहे. या बँकेने मनगटात घड्याळ बांधतो, तसेच मनगटावर घालता येईल असे क्रेडीट कार्ड विकसित केले आहे. यामुळे क्रेडीट कार्डाचा वापर करणारे ग्राहक वाढतीलच तसेच कॅशलेस व्यवहारांना अधिक प्रोत्साहन मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे. बीपे बँड या नावाने हे क्रेडीट कार्ड बाजारात आणले जात आहे.

विशेष म्हणजे तुम्हाला जेथे कुठे खरेदी करायची असेल तेथे हे कार्ड वापरता येईल. अगदी कॉफी शॉपपासून ते जिमची वर्गणी भरण्यापर्यंत कुठेही त्याचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे हे बीपे कार्ड वॉटरप्रूफ आहे आणि संपूर्ण दिवसभरही तुम्ही ते मनगटावर बांधू शकता असे बँकेचे म्हणणे आहे. हे कार्ड स्वाईप करण्यासाठी दुकाने, बस टर्मिनल, रेल्वे प्लॅटफॉर्म व खरेदी करण्यायोग्य सर्व ठिकाणी टर्मिनल उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या कार्डातील कॉम्पुटर चीप व मायक्रो एरियलच्या सहाय्याने टर्मिनलबरोबर देवाणघेवाण होऊ शकणार आहे. त्यासाठी नेहमीच्या क्रेडीट कार्डना आवश्यक असणारा चार आकडी पिन नंबर गरजेचा नाही. पारंपारिक प्लॅस्टीक क्रेडीट कार्डला बीपे कार्ड चांगला पर्याय आहे असाही बँकेचा दावा आहे.

Leave a Comment