रिलायन्स कम्युनिकेशनची वन इंडिया वन रेट योजना

reliance
रिलायन्स कम्युनिकेशनतर्फे वन इंडिया वन रेट योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकाला स्थानिक कॉल, एसटीडी आणि रोमिंगसाठी एकच दर द्यावा लागणार आहे. देशाच्या कोणत्याही भागातून या योजनेचा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत. पोस्ट पेड ग्राहकांसाठी ५९९ रूपये व ३५० रूपये असे दोन पर्याय दिले गेले आहेत तर प्रीपेड ग्राहकांसाठी इनकमिंग मोफत असलेले ४५ रूपये पॅकेज दिले गेले आहे.

या योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरूदीपसिंग म्हणाले की ग्राहकांना या योजनेमुळे स्थनिक कॉल, एसटीडी किवा रोमिंगसाठी वेगवेगळे चार्ज भरावे लागणार नाहीत. या योजनेमुळे रिलायन्सचे कार्पोरेट व एसएमई रोमिंग सेगमेंटमधील ग्राहक नक्कीच वाढतील. ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १२०० मिनिटांचे मोफत आऊटगोईंग तसेच २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मोफत करता येणार आहेत. त्यानंतरच्या कॉलसाठी मिनिटांला ३० पैसे आकार पडणार आहे. ३५० च्या प्लॅनमध्ये ७०० मिनिटांचे आऊटगोईंग, २०० मोफत इनकमिंग, १ जीबी डेटा १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत. त्यानंतरच्या कॉलसाठी मिनिटाला ४० पैसे आकार द्यावा लागणार आहे.

प्री पेड ग्राहकांसाठी ४५ रूपये भरल्यानंतर १ महिना इनकमिंग फ्री मिळणार आहे तर आऊटगोईंग कॉलसाठी मिनिटाला ४० पैसे दर आकारला जाणार आहे.

Leave a Comment