राज गरजले, आधीच्या ६६ टोलनाक्यांच्या यादीचे काय ?

2_RAJ_THACKERAY
नाशिक – राज्य सरकारने ४४ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेवून एक दिवस होत नाही तोच मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे आक्रमक झाले आहेत, ४४ टोलनाके बंद केले पण ६६ टोलनाके बंद करण्यात येणार होते ,त्या यादीचे काय? असा सवाल केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारने सोमवारी ४४ टोलनाके रद्द करण्याची घोषणा केली हा निर्णय योग्य असला तरी आधी ६६ टोल नाके रद्द करण्यात येणार होते,त्याबाबत काय झाले अशी विचारणा यावेळी केली. ते म्हणाले ,मुळात राज्याचे टोल धोरण सरकार कधी जाहीर करणार ? केवळ असे टोलनाके बंद करून प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिले होते की राज्य सरकारकडून नवे टोल धोरण आणले जाईल, पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. हे ४४ टोलनाके बंद करून राज्य सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे.असे ते म्हणाले

Leave a Comment